मानवी जीवनाला अर्थप्राप्त करुन देणार्‍या स्रीशक्तीचा अविष्कार हेच विश्वाचे अनोखेपण..

ती मधूरा जगणं……सुंदर करणारी
ती तनिष्का…..जीवनाला ऊर्जा देणारी
चराचर सृष्टीतली नितांतसुंदर रुप असते ती
पुरुषार्थालाही पुर्णत्व देणारी…..
तिच्याशिवाय जगणं अधुरं……

21 व्या शतकामध्ये स्री ही अार्थिकदृष्ट्या सक्षम झाली अाहे.महिलांनी डाॅक्टर, वैमानिक, शिक्षीका, राष्र्टपती, जेट कमांडर, महीला अाय.पी.एस, speaker, विश्वसुंदरी,अंतराळवीर. अशा अनेक क्षेत्रात अापले योगदान दिले अाहे,परंतु अारोग्याच्या बाबतीत मात्र महीला मग त्या metro city मधल्या असोत अथवा ग्रामीण भागातल्या अजुनही स्वतःकडे दुर्लक्षच करतात.

महीलांनी स्वतःची प्रतीष्ठा स्वतःच ओळखणे अावश्यक अाहे.स्रीचे अारोग्य ही तिची सर्वप्रथम प्रतीष्ठा अाहे. स्रीच्या अारोग्याला अधीक महत्व अाहे कारण ती ज्या अपत्यांना जन्म देणार त्यांना कुठल्याही प्रकारे रोग उत्पन्न झाले तर हळु हळु सर्व समाजाचा र्‍हास होत जातो.

“जिच्या हाती पाळण्याची दोरी…
ती जगाते उद्धारी”

अर्थातच स्रीने अापल्या अारोग्याला सर्वाधीक महत्व देणे गरजेचे अाहे.
स्री व पुरुषांच्या शरिरातील फरक म्हणजे स्रीला असलेले गर्भाशय व तत्तसंबधीत अवयव.सध्या स्रीयांच्या Hormonal संस्थेमध्ये बरेच बिघाड झालेले दिसतात.गर्भधारणा करण्यासाठी अावश्यक असलेले गर्भाशय वा तत्तसंबधीत अवयवात सुज येणे,गाठ येणे,नलीका अवरोधीत होणे अशा प्रकारच्या तक्रारी खुप प्रमाणात वाढलेल्या दिसतात.

या लेखामध्ये अापण सध्याच्या काळात स्रीयांना मगं त्या metro city मधल्या असोत वा ग्रामीण भागातल्या त्यांना ज्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते व त्या बद्दलचे असणारे गैरसमजयाबद्दल माहीती घेणार अाहोत..

  • “सुरवंटाचे होतेय फुलपाखरु”

स्रीच्या अारोग्यामध्ये सर्वात प्रथम सुरवात होते ती मुलीच्या मासिकपाळीपासुन.प्रत्येक स्रीला वयाच्या 11व्या किंवा 13 व्या वर्षी मासिकपाळीची सुरवात होते यालाच menarch म्हणतात.
सद्यस्तीथीमध्ये सगळ्यांची जगण्याची, खाण्याच्या पद्धती, बाहेरचे जंकफुड,सततची बैठक ,मैदानी खेळांचा अभाव यामुळे मुलींमध्ये कमी वयामध्ये स्थुलता ( obesity) येते.त्याचा परिणाम म्हणुन PCOS( polycystic ovarian syndrome) हा प्रकार मुलींमध्ये जास्त प्रमाणात पहायला मिळत अाहे.यात पाळी अनियमीत म्हणजे 2-3 महीने थांबुन थांबुन येते,अती कमी प्रमाणात येते.अंडाशयात बीजांची( ovum) ची माळ तयार होते,याचा परिणाम म्हणुन संतती सुद्धा लवकर होत नाही.

“तुझ्या गळा माझ्या गळा……पण नको अंडाशयात बिजांच्या माळा”
यासाठी संतुलीत अाहार,सकस अाहार व नियमीत व्यायाम करावा उपचारासाठी तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा..

दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे स्रीचा प्रजननकाळ

“उत्तम मातृत्व,नेतृत्व व कर्तृत्व”
अशा तिन्ही भुमिका निभावतांनाचा “मातृत्व” ला महत्वाचा टप्पा यात सकस अाहार,प्रत्येक महिन्याला घ्यावयाची काळजी,योग्य तपासण्या,गर्भारपणात घ्यावयाच्या लसी याचे डाॅक्टरांकडुन योग्य मार्गदर्शन घ्यावे.परंतु एक महत्वाचा मुद्दा मी येथे सांगणार अाहे तो म्हणजे अजुनही अापल्याकडे लग्न जमवतांना कुडंली तर पाहिली जातेच परंतु वर व वधुचा रक्तगट जर एकच असला तर अनेक विवाह केले जात नाही जे शास्रीयदृष्ट्या खुपच चुकीचे असते.जर वर व वधुचा रक्तगट एकच असेल तर ते नक्कीच लग्न करु शकतात,त्यांच्या होणार्‍या अपत्याला काहीही धोका नसतो…..फक्त जर एखाद्या स्रीचा रक्त गट negative असेल म्हणजे उदा. A negative तर अशा स्रीला तिच्या pregnancy च्या 7 व्या महीन्यात व delivery झाल्यानंतर 72 तासाच्या अात “Anti D हे injection द्यावे लागते जेणेकरुन तिच्या दुसर्‍या pregnancy नंतर होणार्‍या दुसर्‍या बाळाला विषारी कावीळ( pathological jaundice) पासुन अापल्याला बचाव करता येईल.पहिल्या अपत्याला काहीही धोका नसतो.

स्रीचा महत्वाचा टप्पा म्हणजे “रजोनिवृत्ती”. यात बिजनिर्मीती तयार होणे बंद होते. अशी कोणतीही Test नाही जीच्याने स्रीला menopause अाला हे ओळखता येते. वयाच्या 45-55 दरम्यान स्रीयांना menopause येतो.

Breast cancer– ज्या स्रीया संततीनिरोधक( contraceptive) म्हणुन सतत गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाची शक्यता सर्वात जास्त असते.तसैच ज्यांना उशीरा गर्भधारणा,सततचागर्भपात,स्तनपान न करणे या स्रीयांमध्ये हि स्तनाच्या कर्करोगाची शक्यता सर्वात जास्त असते.स्तनांमध्ये एखादी गाठ लागत असेल किंवा Nipple मधुन पु अथवा रक्त येत असेल तर त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा व उपचार चालु करावेत.

Cervical cancer– वयाच्या चाळीशी नंतर प्रत्येक स्रीने pap smear नावाची गर्भाशय मुखाच्याcancer ची ( cevical cancer) तपासणी करणे अावश्यक अाहे.चाळीशीनंतर HPV नावाचे vsccine जरुर घ्यावे जेणेकरुन cervical cancer अापण प्रतीबंधीत करु शकतो.

रक्तक्षय–( Anaemia) मासीकपाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणे,मलेरीया तसेच सततचे बाळांतपण,रजोनिवृतीच्यावेळी होणारा अती रक्तस्राव व यामुळे अापल्या भारतीय स्रीयांमध्ये Iron deficiency Anaemia प्रामुख्याने पहायला मिळतो,
ज्यात सततचा थकवा,भुक लागणे,चक्कर येणे,हातापायांना मुंग्या येणे अशी लक्षणे असतात..
यासाठी डाॅक्टरांच्यासल्याने योग्य तो उपचार तर करावाच पण अाहारात टोमॅटो,बीट,शेंगदाणे गुळ,हिरव्या पालेभाज्या,सफरचंद,मनुके दुध व दुधाचे पदार्थ यांचा अाहारात समावेश असावा..

डाॅ सिमा अजय सोनवणे
बी.ए.एम.एस. पुणे.
फिजिशियन
श्री जनरल हाॅस्पीटल, सोनगीर,ता. जी. धुळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *