धारदार शस्त्रांनी प्रेयसीचा खून; 3 आरोपींना नागपूरातुन अटक

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या ढासगड येथे 25 ते 30 वर्षीय महिलेच्या गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या प्रकारणाच्या खुलासा करण्यात चिचगड पोलिसांना यश मिळाले असून प्रियकराने केला प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ठ करण्यासाठी प्रेयसीच्या मृतदेहाला जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. ह्या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकर सह त्याच्या 2 साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

समीर असलम शेख (वय 26) रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर असे प्रियकराचे नाव असून आसिफ शेरखान पठाण (वय 35) रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा, प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25) रा. दुधा (मांगली) जि. नागपूर येथून त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे.

एका अनोळखी महिलेचे मृतदेह ढासगडकडे (पिपरखारी) जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला जंगलात पडलेला आहे अशी माहिती चिचगड पोलिसांना 23 जून रोजी सकाळी 10.50 वाजता मिळाली होती. या माहितीच्या आधारावर चिचगड पोलीस आपल्या ताफ्यासह ढासगड येथील घटनास्थळी गेले असता, ढासगड मंदिराकडे जाणार्‍या डांबरी रस्त्यापासून अंदाजे 25 फुटावर रस्त्याच्या बाजूला अंदाजे 25 ते 30 वर्षीय अनोळखी महिलेचे मृतदेह रस्त्यावरून ओढत नेवून जंगलात टाकण्यात आल्याचे दिसून आले होते. धारदार शस्त्रांनी तिच्या गळ्यावर, डोक्यावर वार करून ठार मारण्यात आले आहे.

या प्रकरणात फिर्यादी गणेशराम सीताराम मारगाये (वय 67) रा. मोहाडी (चिचगड पोलीस ठाणे, ता. देवरी) यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले. सदर अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पाठविण्यासाठी मृतकाचे फोटो सोशल मीडियावर व शोध पत्रिका तयार करन्यात आली शोध सुरु करण्यात आला.

दरम्यान खबरी कडून 18 जुलै रोजी सदर गुन्ह्यातील मृतक अनोळखी महिला व अज्ञात आरोपींबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली असता समीर असलम शेख नागपूर वरुण ताब्यात घेण्यात आले आहे. तपासा दरम्यान लिव्ह लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असतांना मृतका कडून लग्नाचा तगादा वाढल्याने आपल्या 2 मित्रांसह ढासगढ़ जंगलात नेऊन खून केल्याचे कबूल केले आहे. ह्या प्रकरणी 3 आरोपी अटकेत असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *