‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या, दोन मित्रांसह जंगलात नेऊन जीव घेतला

गोंदिया : प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात फेकल्या प्रकरणी 26 वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात 25 ते 30 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या जोडप्यातील तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने आपल्या दोन मित्रांसह जंगलात नेऊन तिची हत्या केल्याचे प्रियकराने कबूल केले.

गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्या अंतर्गत येणार्‍या ढासगड येथे 25 ते 30 वर्षीय तरुणीच्या गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात चिचगड पोलिसांना यश आले. प्रियकराने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिचगड पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

प्रियकरासह दोघांना अटक

समीर असलम शेख (वय 26, रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर) असे प्रियकराचे नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण (वय 35, रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा) आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर (वय 25, रा. दुधा, मांगली, जि. नागपूर) यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *