अंधत्वावर मात करत गाठलं UPSCचं शिखर – लातूरच्या पूजा कदमचं घवघवीत यश

लातूर
युपीएससीने काल आपला अंतीम निकाल जाहीर केला आहे. देशभरातून 752 विद्यार्थ्यांची त्यात अधिकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आपल्या बुद्धीच्या आणि सातत्यपुर्ण अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थी अधिकारी होणार आहेत. देशातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सध्या पूजा कदम या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीची चर्चा सर्वत्र होत आहे.

लातूर जिल्हा हा शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न या नावानं ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातील औसा तालूक्यातील टाका गावची कन्या पूजा कदम देशात 577 व्या क्रमांकाने युपीएससी परिक्षा पास झाली आहे. पूजाने आपल्या अंधत्वावर मात करत हे यश मिळवलं आहे. पूजाला फक्त 15 टक्के दृष्टी आहे. पुजाने आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एवढं मोठं यश संपादन केलं आहे.
 
पूजाने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून केलं आहे. तिने राज्यशास्त्र विषयात पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केलं आहे. पूजा चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. पूजाचे वडील शिक्षक आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हूशार असणाऱ्या पूजाच्या यशाने ग्रामीण भाग असणाऱ्या औसा तालूक्यात आंनदाचं वातावरण आहे. पूजाला दृष्टी कमी असतानाही तीचं हे यश डोळे दिपावणारं आहे. परिणामी लातूर जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर झळकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *