नेहरू युवा केंद्राची मेगा फिट इंडिया रन संपन्न

अमरावती 25 सप्टेंबर हा दिवस स्व पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या आदेशानुसार नेहरू युवा केंद्र अमरावती द्वारा पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्य मेगा फिट इंडिया रन चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या सहकार्याने जिल्हा स्टेडीयम येथे करण्यात आले. सर्वप्रथम पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन उपस्थिताना फिट इंडिया ची शपथ घेवुन मेगा फिट इंडिया रनची सुरुवात मा स्नेहल बासुतकर, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र अमरावती प्रा. अतुल पाटील, इंदीराबाई मेधे महाविद्यालय, श्री. संदीप इंगोले फिट इंडिया जिल्हा समन्वयक व श्री. निलेश जाधव हैंडबॉल कोच यांच्या उपस्थितीत करण्यात आली या फिट इंडिया रनमध्ये युवक युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता श्री संतोष विघ्ने, कीडा अधिकारी अशोक महल्ले, करूणा यानखडे, साक्षी केवटी धिरज कुमार व नरेंद्र धुरडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *