भारतीय विद्यार्थ्यांला राष्ट्रमंडळ पुरस्कार

लंदन, 
वास्तुकला अभ्यासक्रमाच्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी कैफ अली याला राष्ट्रमंडळ पुरस्कार घोषित झाला आहे. त्याने हलक्या आणि स्वस्त घरासंबंधी संशोधन केले आहे. हा पुरस्कार जगभरातील 54 राष्ट्रमंडळ देशांतील 15 विजेत्यांना देण्यात आले आहे.
 
कैफ अली याने भूकंप आणि महापुराच्या स्थितीत वापरण्याजोग्या तसेच सुरक्षितदृष्ट्या कमी गुंतवणुकीतून तयार होणार्‍या घराचे संशोधन केले आहे. त्याच्या या संशोधनाला संयुक्त राष्ट्र संघटनाने हवामान बदल आव्हानांसंबंधी कार्यरत 11 इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप अंतर्गत मान्यता दिली आहे. विजेता म्हणून अली याला 3 हजार पाऊंड (तीन लाख रुपये) इतकी रक्कम मिळणार आहे. राष्ट्रमंडळ संशोधन पुरस्कार जिंकल्याने आपला विश्वास वाढला असून, भविष्यातील कामासाठी प्रेरणा मिळाली असल्याची प्रतिक्रिया अलीने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *