तिराेड्यात ट्रकच्या अपघातात मुलाचा मृत्यू; आई गंभीर जखमी

गोंदिया : भंडारा गोंदिया जिल्हाच्या तिरोडा शहरात (रविवार) सकाळी दहा वाजता कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी वाहनावरून जाणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. संबंधित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गोंदिया शहराच्या मुर्री भागात राहणारा प्रितेश डोहरे आणि त्याची आई दुचाकी वाहनाने भंडारा जिल्ह्यात जाणासाठी निघाले असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने प्रितेश यांच्या दुचाकी वाहनास धडक दिली. ट्रकच्या मागील चाका खाली येऊन प्रीतेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्याची आई यशवंता डोहरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारा करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ट्रक चालकाला तिरोडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *