उद्याला लाखो भाविक घरातूनच अर्पण करणार गुरुमाऊलीला श्रद्धांजली मौन श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम

गुरुकुंज मोझरी: ध्यानगुरु डॉ. कमलेश पटेल यांची प्रमुख उपस्थितीमध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या क्रांतदर्शी महापुरुषाला सोमवार २५ ऑक्टोंबरला ४ वा. ५८ मिनिटांनी भावपूर्ण मौनश्रद्धांजली गुरुकुंज आश्रमात अर्पण करण्यात येणार आहे. पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्वाधिक महत्वाचा असतो.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा अश्विन वद्य पंचमी हा पुण्यतिथी दिन शके १८९० मध्ये महाराजांचे याच दिवशी महानिर्वाण झाले होते. वेळ होती ४ वा. ५८ मिनिटांची.
दि. २५ ऑक्टोबरला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी हा सोहळा होईल. ‘मौन श्रद्धांजलीचा दिवस सर्वसंत स्मृति ‘मानवता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. याप्रसंगी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य आणि विचार लाखो भाविकांना भजन व निवेदनाद्वारे समजावून सांगण्यात येईल. तसेच सर्वधर्मीय व सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम अतिशय गंभीर वातावरणात घेण्यात येणार आहे. या मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचे लाईव्ह UCN श्रद्धा या चॅनल वरून प्रसारण होणार असून गुरुदेव भक्तांनी आपआपल्या गावातच मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रमाचे आयोजन करावे व गुरुमाऊलीला श्रद्धांजली अर्पण करावी. श्रीगुरुदेव सेवामंडळाने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून गुरुकुंज आश्रम येथे भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गुरुदेव भक्तांनी आपल्या गावातच हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *