आय.टी.आय. प्रवेशासाठी पुन्हा नव्याने अर्ज करता येणार रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती : जिल्ह्यातील शासकीय किंवा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्यांची संधी हुकलेली आहे अशा उमेदवारांना रिक्त जागेवर प्रवेशासाठी नव्याने आॕनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी प्रशिक्षण महासंचालनालयाने करून दिलेली आहे. अशा उमेदवारांना दि.२६ आक्टोंबर पर्यंत itiadmissions@dvet.gov.in किंवा www.dvet.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांची गुणवत्ता यादी दि. २७ आक्टोबरला संबंधित संस्थेत लावण्यात येईल. दि.२८ आॕक्टोंबर पासून रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरू होईल. संकेतस्थळावर सूचित केलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.शिल्प कारागीर योजना,आदिवासी उपाययोजना ,अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिकरण योजना ,अनुसूचीत जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे.

 समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करून या प्रवेश फेरीचा इच्छूक उमेदवारांनी  अवश्य लाभ घ्यावा. तसेच  प्रवेशासाठी येताना स्वतःचे मूळ कागदपत्र / प्रमाणपत्र (छायांकित    प्रती २ संचासह ) ,प्रवेश फि रक्कम व २ पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.  जिल्ह्यातील औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी  जवळच्या शासकीय / अशासकीय  औ.प्र.संस्थेशी संपर्क करावा आणि या संधीचा   अवश्य लाभ   घ्यावा ,असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *