पालखी पदयात्रेने दुमदुमली संत नगरी मोझरी.

अमरावती: तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज मोझरी गावात गावकऱ्यांच्या वतीने पालखी पदयात्रा काढण्यात आली होती.दरवर्षी मौन श्रद्धांजलीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात गोपाल काल्याच्या दिवशी राज्यभरातून आलेल्या शेकडो पालख्या मोझरी गावाला प्रदक्षिणा घालत असतात.परन्तु कोरोना मूळे मागील वर्षी आणि यावर्षी देखील गुरुकुंजात पालख्या दाखल झाल्या नाही.त्यामुळे मोझरीतील पालखीची परंपरा खंडित होऊन नये म्हणून मोझरी मधील गावकऱ्यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.या पालखी सोहळ्यात श्री गुरुदेव अध्यात्म गुरूकुलात आलेल्या दोन पालख्यांचा देखील समावेश होता….

पहाटे झेंडा चौक येथे तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सामुदायीक ध्यान पार पडल्यानंतर या पालखी पदयात्रा महोत्सवाला सुरुवात झाली.पालख्याच्या स्वागतासाठी दरवर्षी प्रमाणे गावकऱ्यांनी ठिकठिकाणी सजावट केली होती.ठिकाणी पालख्याचे पूजन महिलांनी गावकऱ्यांनी केले. या पालखी सोहळ्यात मोझरी येथील ओम कोचिंग क्लास च्या विद्यार्थ्यांचे असलेले लेझीम पथक,टाळ मृदुगाच्या निनादावर थिरकणारे विद्यार्थी, डोक्यात टोपी,हातात टाळ मृदुग,कपाळी टिळा,रिंगण सोहळा,अस्व आणि मुखात तुकडोजी महाराजांचा गजर यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या पालखी सोहळा गावकऱ्यांनी मोठया संखेने सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *