अर्जुन नगरात १७.४० लक्ष निधीतून पसरले सुसज्ज रस्त्यांचे जाळे

आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या निधीतून विकास कामांचा धडाका
विकासाच्या कृती आराखड्यानुसार नियोजित कामांची पूर्तता

अमरावती : शहरी विकासाच्या प्रवाहात नागरिक केंद्रित धोरण आणि जनसामान्यांच्या अपेक्षांचा मागोवा घेणारा कारभार स्वच्छ आणि पारदर्शकरित्या राबविण्यासाठी आ.सौ .सुलभाताई खोडके यांच्या वतीने अमरावती विधानसभा मतदार संघामध्ये विकास कार्यक्रमांची सातत्यपूर्ण मालिका राबविल्या जात आहे . नवनवीन वसाहतींमध्ये तसेच विकासकामांचे पूर्ततेपासून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या भागाला आमदार महोदयांच्या वतीने सर्वोतोपरी प्राधान्य दिले जात आहे . शहरी क्षेत्रात पायाभूत सुविधांची उपलब्धी करतांना जनसामान्यांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण करण्यासह नागरिकांना अपेक्षित विकास कार्यक्रम राबविण्याचे धोरण सुद्धा सौ .सुलभाताईंच्या वतीने अवलंबिल्या जात आहे . याशृंखले अंतर्गत आमदार निधी या शीर्षाखाली १७. ४० लक्ष निधीतून अर्जुन नगर परिसरात रस्ते विकासाची कामे मार्गी लागत आहे. या अंतर्गत दत्तवाडी अर्जुन नगर येथील डी.पी. रोड पासून ते अनुसयामाता मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे काम ११ लक्ष निधीतून पूर्ण झाले आहे. बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी याचे लोकार्पण आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. तर ६ . ४० लक्ष निधीतून कुऱ्हे आप्पा ले-आऊट परिसरातील अंतर्गत रस्ता बांधकामाचा शुभारंभ आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.

आमदार महोदयांनी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून अनुक्रमे लोकार्पण व भूमिपूजनाची औपचारिकता साधली . अर्जुन नगर परिसरात अनेक लोकवस्ती व रहिवाशी क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे सुरक्षित अवागमनासाठी परिसरात सुसज्ज रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. निवडणूक पूर्व काळात आपण परिसराला भेट दिली असता स्थानिकांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत अवगत केले . त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालीत ,निवडणूक पूर्व केलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे मनोगत आ . सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केले . दरम्यान आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . विकासाच्या कृती आराखड्यावर अंमल करतांना अर्जुन नगर परिसरात विकासात्मक बाबींची पूर्तता करण्यास आपले सर्वतोपरी प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास देखील आ.सौ .सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केला . परिसरात १७. ४० लक्ष निधीतून विकास कामे मार्गी लागल्या बद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानण्यात आले. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत प्रकाश लोखंडे, यश खोडके, प्रशांत उर्फ गुड्डु धर्माळे, राजेश कोरडे, प्रमोद महल्ले, योगेश सवाई, शुभम पारोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता – अनिल भटकर, स्थापत्य अभियंता – स्वप्निल तालन, गोवर्धन लांडे, अजय काळमेघ, गोपाल पवार, राजेंद्र जायले, उमाकांत कावळे, रोशन घोरमाडे, सुधिर धावडे, राहुल धोंडे, निरंजन देशमुख, प्रविण वानखडे, ज्ञानेश्वर राऊत, शरद देशमुख, दिलीप राऊत, देविदास हिंगणे, सुभाष वानखडे, ज्ञानेश्वर चिंचे, मुरलीधर खडसे, सिताराम सावरकर, अशोकराव वनवे, रामभाऊ डहाके, अमोल पवार, पवन व-हाडे, प्रितम रेवस्कर, मुकुंद दामेदर, महादेव दामदर, सचिन गावंडे, बबलु बिटणे, नरेंद्र बोकडे, मिलिंद पोहकार, रविंद्र तराळ, विनायकराव व-हाडे, नाना भोंबे, युवराज कराळे, पांडुरंग भागडे, हिरामन खंडारे, रविंद्र खेडकर, बबलु बिटने, प्रकाश राठो़ड, प्रकाश जाधव, अतुल हुड, डाॅ. शिवा पुंडकर, नरेंद्र केचे, मोहन भोयर, राजेंद्र चौधरी, प्रकाश धर्माळे, मोरेश्वर दंडाळे, रवि मोहोड, विठ्ठल सपकाळ, ज्ञानेश्वर फसाटे, व्ही.आर. लोहडे, ज्ञानेश्वर अडोकार, किसन बारमासे, गजानन चाैधरी, सुभाष यावले, कपील ढाले, सौ. आशा धोटे, अर्चना मोहोड, ज्योती देशमुख, उज्वला चरपे, अर्चना चौधरी, सोनल शिरभाते, चंदा हुड, ललिता धर्माळे, बेबीताई भाकरे, आदी सहीत दत्तवाडी – कु-हेआप्पा लेआऊट, या परीसरातील जेष्ठ नागरीक, महिला भगिनींसह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमा अंती सर्व उपस्थितांचे प्रशांत उर्फ गुड्डु धर्माळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *