अमरावतीमधील प्राध्यापकांचे ऑनलाईन २८ लाख उडवले, खाते बंद पडण्याची केली होती बतावणी

अमरावती | शहरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या प्राध्यापकाला केवायसी अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते बंद होईल. अशी बतावणी ठकबाजाने मेसेज पाठवून केली. प्राध्यापकाचा समाज झाला कि हा मेसेज बँकेतून आला. त्यामुळे प्राध्यापकाने संबंधित मोबाईल क्रमांकावर कॉल करून त्यांच्या इंटरनेट बँकिंगचा युजर आयडी व पासवर्ड त्याला दिला. तो मिळताच ठकबाजाने या प्राध्यापकांचे अख्खे बँक खाते रिकामे करून चार दिवसात तब्बल २८ लाख १३ हजार रुपये काढले. या प्रकरणी प्राध्यापकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध शुक्रवार २९ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला. एकाचवेळी २८ लाख रुपयांची ऑनलाईन रक्कम उडवल्याची ही शहर व जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. शहरातील मोहन कॉलनीत राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापकाने याप्रकरणी तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *