श्री शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे स्वच्छता अभियान

स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या एनसीसी विभागाने, ८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावतीच्या नियोजनांतर्गत दि. ३० आक्टोंबर २०२१ रोजी महाविद्यालय परीसरात स्वच्छता अभियान राबवून संपुर्ण परीसर स्वच्छ केला या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना बोबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान पार पडले. या उपक्रमाच्या यशस्वीते करीता डॉ लेफ्ट. जी जी भारती याच्या पुढाकाराने तसेच डॉ महेंद्र मेटे, डॉ उमेश कडू, डॉ किशोर साबळे, डॉ जयराम गायकवाड, डॉ नितिन चांगोले, डॉ डी. एस. नामूर्ते, डॉ. कुमार बोबडे, डॉ मनोज जगताप, डॉ सुभाष गावंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, या प्रसंगी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह ४६ कॅडेटस सक्रिय सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *