अमरावती शहरात आमदार सुलभाताई खोडके यांनी राबविली सातत्यपूर्ण विकासाची मालिका

  • दर्जेदार व गुणवत्तापूर्वक विकास कामातून शहराला आली नवी चकाकी
  • विलास नगर -लक्ष्मी नगर व सरस्वती नगरात ४३.७० लक्ष निधीतून मूलभूत सुविधांची कामे

अमरावती ३१ ऑक्टोबर : शहरात विकास कामांची गतीने पूर्तता होत असतांना त्या कामांचा दर्जा व गुणवत्ता ढासळू देऊ नये. यासाठी अधिकारी वर्ग व कंत्राटदारांनी सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी पार पडून बांधकामे करतांना ते काम गतीने व गुणवत्ता पूर्वक होण्यासाठी तत्पर भूमिका घ्यावी. नागरिकांशी सुसंवाद राखून लोकाभिमुख विकासाला प्राधान्य घेऊन शास्वत विकासाचा चालना देण्याचे आवाहन आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी केले. अमरावती विधानसभा मतदार संघातील विलास नगर भागात मूलभूत सुविधांच्या ३० लक्ष निधीतून साकारण्यात आलेल्या प्रशस्त व सुसज्ज अशा रस्ता काँक्रिटी करणाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. याच शृंखलेत आमदार निधी या शीर्षाखाली ६.२० लक्ष निधीतून लक्ष्मी नगर भागात नालीचे बांधकाम करण्यात येत आहे . तर सरस्वती नगरात मूलभूत सुविधांच्या ७.५० लक्ष निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. या दोन्ही विकास कामांचे भूमीपूजन देखील आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले.
विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या सदर तिन्ही परिसरात ना-ना तऱ्हेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या . त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता . या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आमदार महोदयांना निवेदन दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी विकास कामांकरिता शासनाकडून भरीव निधी मंजूर करून तो सार्वजनिक बांधकाम विभाग या अधिनस्त यंत्रणेला उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून आता शहरात विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाचा धडाका सुरु असून शहरात विकासाची गंगा वाहतांना दिसत आहे. विलास नगर -लक्ष्मी नगर व सरस्वती नगर या परिसरातील समस्या मार्गी लावून विकास कामांची गतीने पूर्तता केल्या बद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचे आभार मानीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधण्यासह आमदार महोदयांच्या वतीने निवेदनाचा स्वीकार करण्यासह आगामी काळात विकासकामांना घेऊन नियोजन करीत त्याची पूर्तता करण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला. शहरी क्षेत्रामध्ये नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांना अपेक्षेनुरूप विकास कार्यक्रम राबविण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य राहील, या शब्दांमध्ये स्थानिकांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराप्रती त्यांनी यावेळी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली.

यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, प्रविण भोरे, प्रशांत पेठे, भागवत उर्फ बंडु निंभोरकर, नगरसेवक धिरज हिवसे, पंजाबराव तायवाडे, महेश साहु, प्रमोद महल्ले, यश खोडके, प्रथमेश गवई, राहुल गुप्ता, सुनिल चव्हाण, श्याम लकडे, आसिफभाई घोरी, सुरेश गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता – विनोद बोरसे, शाखा अभियंता – सुनिल जाधव, कंत्राटदार – अनुराग लढ्ढा, प्रतिक धोटे, स्वप्निल जयस्वाल, मनपाचे उपअभियंता – प्रमोद इंगोले, रामचंद्र देवगडे, विजय वाहणे, राजेश नाईक, शुभम पारोदे, आशिष चव्हाण, विशाल भाटी, जय तायवाडे, मयंक गोहील, किरण मोरे, श्रवण भोरे, स्वराज वानखडे, सुधिर ठाणेकर, शरद शेवणे, सुनिल घोरमाडे, प्रमोद इंगळे, नरेंद्र वानखडे, भगवंतराव आवारे, दिपक गडवाले, अक्षय ढोले, शाहु जवंजाळ, निरज उसरेटे, सुनिल गोलाईतकर, यश येरोकार, अविनाश पेठे, सुधिर लव्हाळे, संतोष तायडे, रुपराव सनके, रमेश इंगोले, अनंतराव कुचे, सुधाकरराव गोहत्रे, सुभाष मोर्ये, रमेशराव पेठे, शिवनारायण तायडे, सौ. रिना भोरे, माजी नगरसेविका – रेखा तायवाडे, मीना लकडे, अनिता इंगळे, मेघा डंबाळे, शारदा विधळे, अनिता चव्हाण, उज्वला वानखडे, वर्षा वानखडे, अंजली ठाणेकर, प्रणिता गोलाईतकर, सुषमा घोरमाडे, जया तायवाडे, वैशाली पेठे, विजया निंभोरकर, प्रमिला माहुरे, शांता विखार, सरिता माळोकार, सिंधु देशमुख, कुसुम पांडे, जया पाटील, उर्मीला गट्टाणी, अमृता विखार, मिना मोहोड, मेघा तायडे, पुष्पा जयस्वाल, मंगलम मोरे, ज्योत्सना गोहत्रे, लता पाचाळे, अर्चना पठाळे, कविता इसळ, पुजा पाटील, शितल पेठे, प्रतिभा गिरी, सिमा वानखडे, बनासर गट्टाणी, जया पाटील, वैशाली पावडे, स्वप्निल जयस्वाल, ओमप्रकाश तायडे, गौरव तायडे, गणेश श्रीराव, शामराव लव्हाळे, नारायणराव टेकाडे, स्वप्निल फाळे, अभिषेक वैद्य, राहुल चावरे, त्र्यंबक इंगळे, योगेश पखाले, महादेवराव पखाले, मंगेश कोल्हे, रामदासराव पखाले, पंजाबराव पांडे, गणेशराव वानखडे, मनोहरराव भोकरे, पवनराव कोसे, विश्वनाथराव खारोडे, लक्ष्मणराव लोथे, लखनलाल यादव, अंकित पुसदकर, राजेंद्र खंडारे, प्रमोद माहुरे, चेतन काळे, मनोज अंबाडकर, सुनिल गोलाईतकर, मेहरे, राहुल कुकडे, शरद जवंजाळ, महेंद्र घनखे, अनिल खंडारे, सचिन सरदार, वेदांत दुर्गे, नारायणराव इसळ, दिलीप जोशी, पंजाबराव इसळ, राधेश्याम अग्रवाल, लक्ष्मीकांत काळमेघ, शिवलाल तायडे, अनंत पारिसे, किर्तीकुमार गठ्ठाणी, अतुल जयसिंगपुरे, भाष्कर बोबडे, स्वप्निल वाठ, संतोष तायडे, केशवराव गाढवे, मुन्नाभाऊ जुनघरे, गणेश श्रीराव, स्वप्निल जयस्वाल, त्र्यंबकराव इंगळे, सुशांत विखार, भागवतराव वानखडे, लखनलाल यादव, ज्ञानेश्वरराव ठाकरे, गजाननराव जुनघरे, गणेशराव वानखडे, विवेक भाकरे, चंद्रकांत देव, कृष्णा वानखडे, मंगेश कोल्हे, मनोज जायले, आदी सहीत विलास नगर – लक्ष्मी नगर – सरस्वती नगर येथील जेष्ठ नागरीक, महिला भगिनींसह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *