भंडारा । वाहन चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपींना अटक, भंडारा पोलिसांची कामगिरी

लिफ्ट मागून चालकाला चहामधून गुंगीचे औषध पाजून वाहनांची चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. या टोळीने भंडारा जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील मंडला येथून वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी आरोपींकडुन एक अर्टीगा वाहन जप्त केले असुन इतर चोरीचे वाहन आरोपींनी विक्री केल्याची माहिती आहे.

पुष्पेंद्र सिंह उर्फ गब्बर मितंजय सिंह चालुक्य (४२) रा. खैरागड, राजनांदगाव, सतबिर सिंग निंदर सिंग शेरगिल (३६) रा. भिलाई, भाष्कर ऋषी नंदेश्वर (५२) रा. साकोली अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत.

९ नोव्हेंबर रोजी तुमसर येथील बसस्थानकावर कैलास तांडेकर रा. आंधळगाव हे कार ( क्र. एमएच ३६ झेड ६०१६) घेऊन आले असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांना लिफ्ट मागितली. कारमधून काही अंतरावर गेल्यानंतर गोडीगुलाबी करीत त्या अज्ञात व्यक्तीने चहा व बिस्कीटमध्ये गुंगीची औषध टाकून कैलास यांना दिली. कैलास बेशुद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांची कार पळवून नेली. याप्रकरणी तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *