भंडारा | जुन्या भांडणावरून तरुणाचा खून; मांगली येथील घटना, पाच आरोपींना अटक

तुमसर, जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी 25 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील मांगली येथे घडली. शुभम रमेश आगाशे रा. मांगली असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी राजा सुरेश मल्लेवार (21), गौरव उर्फ विक्की कृष्णा राकडे (18) दोघेही रा. विनोबा नगर तुमसर, काशिनाथ हलमारे (45), सोनू काशिनाथ हलमारे (20), गुड्डू हलमारे (30) तिघेही रा. खापा ता. तुमसर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम आगासे हा ट्रकचालक होता. 19 नोव्हेंबर रोजी शुभमचे आरोपी काशिराम, प्रमोद व राजकुमार यांच्याशी भांडण झाले होते. त्यामुळे शुभमला संपविण्याचा कट त्यांनी रचला. त्यानंतर राजा सुरेश मलेवार व गौरव विक्की राखडे यांच्या मदतीने सर्व आरोपींनी संगनमत करून शुभमला त्याच्या घरून उचलले. त्याला मांगली गावातील कानोबा तलावाच्या पाळीवर नेऊन लोखंडी धारदार चाकूने शुभमच्या पोटावर, छातीवर, पाठीवर वार करून खून केला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 302, 114, 34 अन्वये आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक चिंचोळकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *