ह्रदयद्रावक : 3 वर्षीय चिमुकल्यासह पतीपत्नीने घेतलं पेटवून; दोघांचा मृत्यू

भंडारा – घरगुती भांडणातून पतीने आपल्या पत्नीसह 3 वर्षीय चिमुकल्याला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथे मध्यरात्री घडली आहे. घरगुती भांडणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच प्रमाण बरच वाढलेलं आहे. कोणी विष पिऊन आपलं आयुष्य संपवत आहे, तर कोणी गळफास घेत, मात्र आपल्या 3 वर्षाच्या चिमुकल्यालासह पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात घडली आहे.

घरगुती भांडणाच्या कराणातून महेंद्र सिंगाड़े वय 38 याने पत्नी मेघा शिंगाड़ेसह आपल्या 3 वर्षीय मुलाला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यु झाला आहे. तर 3 वर्षीय चिमुकल्यावरती भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान सदर घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविन्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *