चंद्रपूर | राष्ट्रवादी नेत्यांचा भीषण अपघात; अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे, भाऊ जागीच ठार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. रणमोचन गावाजवळ ट्रॅक्टर आणि क्रेटा कार यांची रस्त्यावरती अपघाती धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जि. प. उपाध्यक्ष अतुल गण्यारपवार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे चुलत भाऊ आनंद यांचा घटनास्थळी मृत्यू, अतुल गण्यारपवार यांना ब्रह्मपुरीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, हा अपघात एवढा भीषण होती की ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त नागरिकांना दवाखान्यात दाखल केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *