अमरावती । अल्पसंख्यांक बहुल भागातील विकासाचा अनुशेष भरून काढणार – आमदार सुलभाताई खोडके

मूलभूत सुविधांच्या ७१.५४ लक्ष निधीतून अराफत कॉलनी, असीम नगर, झायद नगर भागात विकास कामे मार्गी, आमदार सुलभाताई खोडके यांनी लावला लोकार्पणाचा धडाका

अमरावती २९ जानेवारी : शहरी भागात पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसह सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घरा- घरा पर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. शहरातील अल्पसंख्यांक बहुल भाग हा बऱ्याच वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक परिसरात मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामातून शाश्वत विकासाची पायाभरणी करून अल्पसंख्यांक बहुल भागातील विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचा मनोदय अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला . शहराच्या अल्पसंख्याक बहुल भागात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांच्या विशेष अनुदानातील ७१.५४ लक्ष निधीतुन पूर्णत्वास आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शनिवार दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले . ज्यामध्ये १३.०६ लक्ष निधीतून अराफत कॉलनी येथील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. तर मूलभूत सुविधांच्या २८. २४ लक्ष निधीतून असीम कॉलनी मधील कॅपिटल मेडिकल ते शरीफा मज्जीद परिसरात अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने परिसराला नवी चकाकी आली आहे. याच श्रुखंलेत मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत असलेल्या झायद नगर मधील बब्बूभाई विटावाले ते रफिकभाई यांचे घरापर्यंत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम १५ लक्ष निधीतून करण्यात आले आहे. तसेच १५.२४ लक्ष निधीतून झायद नगरातील रस्त्यांनी कात टाकली असून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने स्थानिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट व पाहणी करून आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी विकासकामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली. यावेळी आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच स्थानिक परिसराची पाहणी करीत निवेदनाचा देखील स्वीकार केला. मागील अनेक वर्षांपासून या भागात मूलभूत सुविधांच्या विकास कामांची पूर्तता न झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते . रस्त्याची दुरावस्था झाल्याने अवागमनाचा प्रश्नही निर्माण झाला होता. तर नादुरुस्त नाल्यांमुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आमदार महोदयांना निवेदनाद्वारे अवगत करून लक्ष वेधले असता आमदार महोदयांनी या भागात विकास कामांकरिता निधी उपलब्द करून जनतेची समस्या निकाली काढली. सदर रस्त्याची कामे नियोजित वेळेत पूर्ण करून दर्जेदार व गुणवत्तापूर्वक रस्त्याची निर्मिती करून स्थानिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना देखील आमदार महोदयांच्या वतीने संबंधित बांधकाम यंत्रणेला देण्यात आली .याची फलश्रुती म्हणून आता शहराच्या अल्पसंख्यांक बहुल भागाचा कायापालट होत असून मूलभूत सुविधांच्या पूर्ततेतून स्थानिक परिसराला नवी चकाकी आल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावत चालले आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आ. सौ. सुलभाताई खोडके यांचा सत्कार करीत त्यांच्या कामांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांसह मानवविकासाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण नियोजित विकास कामांचा कृती कार्यक्रम राबविला असून त्याची पूर्तता केली जात आहे. स्थानिक परिसरात सुसज्ज रस्ते, नालीचे बांधकाम, स्वच्छता व सौंदर्यीकरण तसेच विविध पायाभूत सुविधांची उपलब्धता करून विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे मनोगत आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी या प्रसंगी व्यक्त केले .आगामी काळातही विकासाची मालिका अशीच अबाधित राहणार असून स्थानिक परिसरात अंगणवाडी सुविधा व मनपाच्या शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्धीवर आपला भर राहणार असल्याचा विश्वास सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रशांत डवरे , हाफिज नाजीम साहब, फारुखभाई मंडपवाले, ऍड शोएब खान, यश खोडके. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महादेव मानकर, मोहम्मद नाझीम, मुफास्सील अली, ताजुद्दिन भाई , जावेद भाई , मंजूर भाई , मोहम्मद सलीम, कारी अब्दुल हमीद, वसीम भाई, मोहम्मद मुजाहिद, मोहम्मद मुजम्मिल, हमीद खान, इरफान भाई, उसामा खान, अफसर खान, बब्बू अंपायर, समीर खान, इलियास एस. के., रेहान पठाण, अरसलान खान, शेख फिरोज, अब्दुल राझिक, हबीब बेग, मोहम्मद सोहेल, अब्दुल जमील किराणा वाले, जियाउल्लाह खान, सय्यद नासिर, मोहम्मद एजाज, मेहफूझ अहमद, हाजी इस्माईल खान, मेराज खान इस्माईल खान, ओवैस अली, अब्दुल राहील, सईद सोहेल, काझी इंझमाम, फुजेल, अरबाज खान, मोहम्मद रफिक, मोहम्मद झुबेर शेख, डॉ. जावेद अमीन, मोईन खान , मोहम्मद एहसान, मोहम्मद रईस , समीउल्लाह खान, अब्दुल मजीद, शेख नजीर, नावेद पटेल, शोएब शेख, तेहसीन खान, आमिर खान, मोहम्मद अजीजुद्दिन, गाजी जहरोश , सनाउल्ला खान ठेकेदार, सय्यद साबीर, सनाउल्ला सर, फिरदौस गाजी, असिफ मन्सुरी, अस्लम खान, सादिक मन्सुरी, सलीमभाई चष्मेवाले, अब्दुल सत्तार, अब्दुल नईम , अब्दूल रहमान, अब्दुल नजीब परवेझ, अमानभाई मंडपवाले, हबीबखान ठेकेदार, सादिक रजा, फहीम मॅकॅनिक, इम्रानभाई , आबू शमा, सबदर अली मौलाना, अफसर बेग, नदीम मुल्ला सर, वहीद खान, अबरार साबीर, नईमभाई चुडीवाले, ऍड. शब्बीर भाई, हाजी अख्तर हुसेन, सादिकभाई आयडिया, दिलबर शाह, समीउल्ला पठाण, मोहम्मद नाजीम सर, सादिक कुरेशी, आबिद सर, नाजीम सर, आसिफ सर यांच्या सह अराफत कॉलनी, असीम नगर, झायद नगर येथील स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *