धारणी | अन्नपूर्णा ज्वेलर्स दुकान फोडणारे तीन चोरांना पकडले, उर्वरित फरार

२ ९ जानेवारी खकणार ( मध्यप्रदेश ) पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या तुकईथड येथील अन्नपूर्णा ज्वेलर्स दुकान फोडून १८ लाखांचा माल चोरणाऱ्या ६ पैकी ३ चोरांना मध्यप्रदेश पोलिसांनी पकडले . धारणी येथील रहिवाशी दुर्गेश सोनी यांचे तुकईथड येथील सराफा दुकानाचे शटर तोडून सोने व चांदीचे दागिने तथा रोख एकूण १८ लाखांची चोरी २२ जानेवारीच्या पहाटे झाली होती . या प्रकरणी पोलिसांनी मास्टरमाईंड दादू उर्फ रामकिसन आणि कम जुवानसिंग यांना अटक केली . मास्टरमाईंड दादूने या चोरीची पटकथा लिहून इतर जणांच्या मदतीने धाडसी चोरी पूर्णत्वास आणली . चोरी केल्यावर सोन्या – चांदीचे दागिने पारा गावाचे सोनार रोहित सोनी याला विकले होते . रोहित सोनीला अटक करून ६ किलो ११० ग्रॅम चांदीसह एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . इतर तीन आरोपी फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *