बिबट्याची नखे, दात, मिशा विकण्याचा डाव, आरोपीला नागपूर आणि भंडारा वन विभागाकडून अटक

भंडारा: नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत बिबट्याचे अवयव विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून बिबट्याच्या मिशा, नखे आणि दात जप्त करण्यात आलेले आहेत. नागपूर वन विभागाला मिळालेल्या माहिती नुसार पवनी तालुक्यातील सावरला येथे वन्य प्राणी बिबट याच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नागपूर वन विभागाच्या टीमने भंडारा वन विभागासह विशेष पथक तयार करुन सापळा रचला. आरोपीला या गोष्टीची अंदाज लागल्याने त्याने तिथून पळ काढला. मात्र, वन विभागाच्या चमूने आरोपी रंगनाथ शंकर माथेरे (वय 35) राहणार तोरगाव, चंद्रपूर येथून मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपीकडून बिबट्याच्या मिशा 21 नग, 13 नखे आणि बारा दात यामध्ये चार सुळे दात समाविष्ट आहेत.

आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमांतर्गत वन विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षण भंडारा हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *