अमरावती जिल्ह्यामध्ये दोन दिवसात तीन बालविवाह थांबविण्यात यश

अमरावती – महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष अमरावती काळजी व संरक्षणाच्या बालकांकरिता काम करत आहे गेल्या दोन वर्षात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पन्नासच्या आसपास बालविवाह थांबविले आहे. पालक आपल्या बालकांची अल्पवयातच लग्न करीत असल्याचे दिसून येत आहे परंतु बाल संरक्षण कक्षाने जिल्ह्यातील प्रत्येक गावा मध्ये ग्राम संरक्षण समिती स्थापन केलेली आहे आणि अनेक बालकांच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्था यांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये काळजी व संरक्षणाच्या बालकांकरिता काम केल्या जात आहे अशाच प्रकारे जिल्ह्यामधील चांदूर बाजार येथील एक व अचलपूर तालुक्यामध्ये दोन असे दोन दिवसात तीन बालविवाह थांबविण्यात बाल संरक्षण कक्ष आला यश आले आहे.चांदूरबाजार तालुक्यात चांदुर बाजार मधील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती व अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर येथे दोन अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला प्राप्त झाली सदर माहिती च्या आधारे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ उमेश टेकाडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांच्या मार्गदरशनाखाली कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार बालिकेचे वय अठरा वर्षाच्या आत आहे की नाही याची पडताळणी करण्यात आली. बालीकांची वय अठरा वर्षाच्या आत असल्याने विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे यानुसार बाल संरक्षण कक्षाने सदर बालिकांच्या पालकांच्या घरी जाऊन बाल विवाह प्रतिबंधात्मक कायदा 2006 नुसार कार्यवाही करून होणारा विवाह थांबविण्यात आला सदर बालिकांच्या पालकांना बालकांचे वय अठरा वर्षाचा होईपर्यंत लग्न करणार नाही असे हमीपत्र भरून घेण्यात आले तसेच सदर बालिकांना बाल कल्याण समिती अमरावती समोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले. चांदूर बाजार येथील बाल विवाह कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन एपीआय राउत साहेब तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे समुपदेशक आकाश बरवट हे उपस्थित होते तसेच अचलपूर तालुक्यामधील गोंडविहिर येथील कार्यवाही मध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या विधी तथा परिविक्षा अधिकारी सीमा भाकरे, समुपदेशक आकाश बरवट व चाइल्ड लाईन समन्वयक अमित कपूर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *