*PDMC च्या OPD विभागात ५६ हजाराची चोरी*

मिळालेल्या माहिती नुसार अभिलाष अशोक उमक नामक विद्याथी हा पीडीएमसी दवाखाना येथे आकस्मीत कक्षात वैदयकिय कर्तव्यावर हजर असतांना अभिलाष यांनी त्याचे जवळील काळया कलरची कॉलेज बॅग त्यामध्ये रोख एकुण ४०,००० / – रू व ०७.५० ग्रॉम सोन्याची जुनी वापरती अंगठी किं अं १५,००० / रू तसेच फास्ट ट्रॅक कंपनीची जुनी वापरती घडयाळ किं अं १००० / – रू तसेच एसबीआय बँक व इंडीयन अलाहाबाद बँकेचे पासबुक काळया कलरचे कॉलेज बॅग मध्ये ठेवलेले सदर बॅग ही आकस्मीत कक्षात पीडीएमसी दवाखाना मधील मेडिसीन रेसिडेन्सी रूम मध्ये ठेवली होती व अभिलाष हा कर्तव्यावर गेले व काही वेळानंतर परत मेडिसीन रेसीडेन्सी रूम मध्ये आले असता अभिलाष याला त्याची कॉलेज बॅग दिसुन आली नाही अभिलाष याची एकुण ५६,००० / – रू चा माल ची ब्याग कोणीतरी अज्ञात चोरून नेली असल्याची घटना समोर आली असता अभिलाष उमक याने गाडगे नगर पोलिसात तक्रार दाखल केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *