सीबीआयची मोठी कारवाई! देशात 56 ठिकाणी चाइल्ड पॉर्नोग्राफी विरोधात छापेमारी

नवी दिल्ली – चाइल्ड पोर्नोग्राफी हा देशातील वाढता चिंतेचा विषय बनला आहे. या प्रकरणी आता सीबीआयकडून देशभरात मोठी कारवाई सुरु आहे. सीबीआयकडून 20 राज्यांमध्ये 56 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. सीबीआयने या कारवाईला ‘ऑपरेशन मेघदूत ‘ असे नाव दिले आहे. सीबीआयला सिंगापूरमधून इंटरपोलच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली होती, त्यानंतर सीबीआयने ही धडक कारवाई सुरु केली आहे. सीबीआयचे हे छापे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पाटणासह 20 राज्यांमध्ये सुरू आहेत.

सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधितच नसून लहान मुलांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात आहे. ही टोळीकडून वेगवेगळे ग्रुप बनवून आणि वैयक्तिक पातळीवर काम करतात. दरम्यान, याआधी नोव्हेंबर 2021 मध्ये सीबीआयने असेच ‘ऑपरेशन कार्बन’ राबवले होते, जेव्हा 83 लोकांविरुद्ध देशभरात 76 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते आणि अनेक लोकांना अटक करण्यात आली होती.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक टोळ्या ओळखल्या गेल्या आहेत, ज्या केवळ बाल लैंगिक पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्रीचा व्यवसाय करत नाहीत तर मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करतात आणि त्यांचा वापर करत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. या टोळ्या गट तयार करून आणि वैयक्तिकरित्या काम करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *