आमदार सुलभाताई खोडके यांचे हस्ते शालेय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन, शिवाजी बीपीएड च्या प्रांगणात रंगणार कबड्डीचे सामने

अमरावती ०६ डिसेंबर | अमरावती मनपा जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन 6 डिसेंबर 2022 ला श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमरावती जिल्हा प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय खोकले यांनी आमदार सौ सुलभताई खोडके यांचे स्वागत केले त्यानंतर मैदानाचे विधिवत पूजन होऊन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी उपस्थित 50 संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना हरणे किंवा जिंकणे फार महत्त्वाचे नसून सर्व खेळाडूंनी आपल्या खेळ कौशल्यांचे करून आपला क्रीडा विकास शारीरिक विकास साध्य करून आपणा सर्वांच्या सहभागातून आरोग्य संपन्न राज्य व राष्ट्र निर्माण व्हावे याप्रसंगी त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला श्री संत विघ्ने, श्री संतोष अरोरा, महेश अलोने, संदीप इंगोले नितिन चव्हाल, संदेश गिरी सतीश पाटिल सर्व संघटना पदाधिकारी शिक्षक व700खेळाडू मैदाना वर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *