स्व. अशोक सोमाणी स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर संपन्न, गरजू महिलांना आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप

रक्तदान शिबीर आयोजनातून रक्त उपलब्धीच्या कार्यात सामूहिक सहभाग मोलाचा – संजय खोडके

अमरावती १२ डिसेंबर : स्वर्गीय अशोक मांगीलाल सोमाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार ११ डिसेंबर रोजी ३६ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन वर्धमान नगर,शिलाँगण रोड, अमरावती येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष- संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. सोमाणी परिवार व अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे वतीने आयोजित या शिबिरात रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान करीत सर्व उपस्थितांना आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय करून दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले. आटणार नाही रक्ताचा झरा – तीन महिन्यातून एकदा तरी रक्तदान करा.या घोषवाक्याकडे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून या शिबिरादरम्यान रक्तदात्यांनी सर्व उपस्थितांना रक्तदान करण्याकरिता प्रेरीत केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. स्वर्गीय अशोक सोमाणी यांच्या प्रतिमेला संजय खोडके व सोमाणी कुटुंबातील सदस्य तसेच अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे सदस्यांनी पुष्प अर्पण केल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यासोबतच स्वर्गीय अशोक सोमाणी यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्व उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा आज सुध्दा सोमाणी कुटुंबियांच्या वतीने चालविला जात असल्याचे सांगितले. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके व संजय खोडके यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या प्रा. डॉ. सोनल चांडक, रितेश खुळसाम यांचा संजय खोडके यांच्या हस्ते शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच गाडगे नगर येथील रहिवासी सुरेखा रवींद्र बॉंडे, तसेच रहटगाव निवासी वर्षा शाम मंनडालकर या महिलांना आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सर्वश्रेष्ठ दान – रक्तदान असा अनोखा संदेश देत सलग ३६ वर्षांपासून रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करीत सोमाणी कुटुंबीयांनी गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक गटाचे रक्त सहजपणे उपलब्ध व्हावे याकरिताच समाजाला रक्तदान शिबिराचे महत्व पटवून देण्यासाठी जे अविरतपणे प्रयसकार्याची मालिका राबविली जात आहे. त्याबद्दल सर्व उपस्थितांचे वतीने यावेळी सोमाणी कुटुंबियांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी महापौर ऍड किशोर शेळके, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, जयकिशोर सोमाणी, राजेंद्रप्रसाद सोमाणी, नवरत्न सोमाणी, सतीश सोमाणी, सुधीर सोमाणी, गोविंद सोमाणी, रोहित सोमाणी, सीए. गोपाल सोमाणी, लक्ष्मीकांत सोमाणी, शरद सोमाणी, वेदांश सोमाणी, महेंद्र भुतडा, मनोहर भुतडा, यश भुतडा, आयुष भुतडा, प्रा.डॉ. रविकांत कोल्हे, शीतल सोमाणी, सरला भुतडा, सुचिता भुतडा, उषा मोहता, रीना मोहता, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे – सचिन काकडे, डॉ. अंकिता भारती, डॉ. अभय आष्टीकर, प्राजक्ता गुलहाने, स्वाती चुळे, अमित धारने,परशुराम पवार,रामेश्वर गगड, किसन सादानी, प्रदीप मोहता, प्रमोद शर्मा, श्याम शर्मा, प्रा. डॉ. संजय कुलकर्णी, योगेंद्र मोहोड, अजय दातेराव, सुनील अग्रवाल, प्रा. राकेश ठाकूर, सीमेश श्रॉफ, डॉ. घनश्याम बाहेती, शैलेश चौरसिया, संदीप गुप्ता, संदीप खेडकर, निषाद जोध, जय हेमराजांनी, प्रा. राजेश पांडे, जस्सी नंदा, संजय हरवानी, युसूफ बारामतीवाला, हरी पुरवार, पवनयन जैस्वाल, मोहन लद्धा, निखिल बाहेती, उमेश पाटणकर, अरविंद बाँबल, डॉ. रामगोपाल तापडिया, रामगोपाल वर्मा, नंदकिशोर करपेकर, रितेश व्यास, शुभम मालानी, हितेश राठी, सुमती जैन, सुनिल अग्रवाल, संजय धुत, शांतिकुमार सारडा, संजय टावरी, रोशन साबू, सुभाष चांडक, गिरीश लद्धा, चंद्रप्रकाश बजाज, सुधीर सोमाणी, रामेश्वर गगड, सुरेश साबू, आनंद मालपाणी, संजय सारडा, परेश भेडा, प्रवीण बुंदेले, यश संजय भुतडा, ऋतुराज राऊत, योगेश सवई, शक्ती तिडके, अनुप सवई, अभिषेक धुरजड, अभिजित लोयटे, अक्षय पळसकर, अनिकेत मेश्राम, मोनू शर्मा, रवी ठाकूर, मनोज भुतडा, निलेश चौधरी, गणेश शेळके, समीर बंड, रवी ठाकूर, आदिसहित अन्य आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र भुतडा यांनी तर प्रास्ताविक नवरत्न सोमाणी यांनी केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे रोहित सोमाणी-गोविंद सोमाणी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *