श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शालेय पैलवानांनी जिंकले बारा सुवर्ण

नुकत्याच दि 12 व 13 डिसेंबर 2022 रोजी श्री हनूमाम व्यायाम प्रसारक मंडळाच्या मेजर ध्यानचंद इन्डोर स्टेडियम मध्ये शालेय विभागीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्तीगिरानी शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता स्पर्धेत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांचा सहभाग होता जवळपास या स्पर्धेमध्ये 400 ते 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धा मुले व मुली अशा दोन प्रकारात घेण्यात आल्या.

श्री ह. व्या. प्र .मंडळाचे 14 वर्षे खालील 35 किलो सुवर्ण ओंकार उघडे ,41किलो सुवर्ण पियुष ढेडवाल, 33 किलो सुवर्ण लक्ष्मी कुरुडे, 17वर्ष आतील 48 किलो सुवर्ण अर्जुन यादव, 60 किलो सुवर्ण अंकित यादव, 65 किलो सुवर्ण प्रदीप यादव, 48 किलो सुवर्ण तेजस ठाकूर, 80 किलो सुवर्ण ओम कालापाड, 58किलो सुवर्ण जस्मित कौर राहल, 19 वर्षाआतील 55 किलो सुवर्ण प्रणव पोहणकर, 67 किलो सुवर्ण पृथ्वीराज तिरथकर, 65 किलो सुवर्ण कशिश माहुरकर, या सर्व कुस्तीगीरांची निवड शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता झालेली आहे एकूण 12 सुवर्ण व 15 रोप्य पदक घेतले आहे. सर्व कुस्तीगिर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभाग येथे डॉ संजय तिरथकर डॉ रणवीर सिंग रहाल श्री जितेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात सराव करतात निवड झालेल्या सर्व कुस्तीगीरांचे संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, अध्यक्ष डॉ रमेश गोडबोले, सचिव डॉ माधुरीताई चेन्ड्के, उपाध्यक्ष डॉ श्रीकांत चेन्ड्के, डॉ संजय तिरथकर, अँड प्रशांत देशपांडे, प्रा रवींद्र खांडेकर व सर्व ज्येष्ठ पैलवानांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *