अमरावतीच्या स्कॉलर कॉन्व्हेंट मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी, स्वच्छता उपक्रमात विद्यार्थी व शिक्षक वृंदांचा सहभाग

अमरावती । दसरा मैदान स्थित स्कॉलर कॉन्व्हेंट मध्ये दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री अय्यंगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करण्यात आले.

यावेळी वर्ग ५ ची विद्यार्थिनी पलक चव्हाण व वर्ग ४ ची विद्यार्थिनी काव्या पढारिया यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण दिले. मुख्याध्यापिका मॅडम यांनी आपल्या संबोधनातून संत गाडगे बाबांनी दिलेल्या संदेशाचा उल्लेख करून मुलांमध्ये संत गाडगे बाबांनी केलेल्या कार्याची जाणीव निर्माण करून दिली. तसेच शाळेमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांनी समाजाला स्वच्छतेचा धडा दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ७ ची विद्यार्थिनी कस्तुरी शिंदे हिने केले. शिक्षिका प्रतीक्षा उत्तमराव तुपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा राबविण्यात आला. तर सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *