डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय स्नेहसंमेलन

दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन द्वारा संचालित डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती येथे दिनांक 4 जानेवारी 2023 ते दिनांक 6 जानेवारी 2023 पर्यंत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे प्रमुख अतिथी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. राजेंद्र जाधवर विशेष अतिथी श्री. विष्णू चौबे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. पंकज मुदगल व शिक्षिका सौ स्मिता महापात्र यांनी केले प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण मालपाणी व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री. प्रदीप श्रीवास्तव यांनी मानले

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनामध्ये शाळा व कर्मचाऱ्यांच्या सर्व दृष्टि बाधित विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला व आपल्यातील कणा गुणांचे प्रदर्शन घडविले. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांद्वारा स्वयम् शासित शाळा व कर्मशाळा चालविली गेली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व कर्मचारी अशा विविध भूमिका बजावल्या व आपल्या आत्मविश्वास व ज्ञानाचे दर्शन घडविले तसेच विद्यार्थ्यांचे ब्रेल लेखन वाचन विणकाम चेस या स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये प्रथम द्वितीय आदी बक्षीस काढण्यात आली ती 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या विविध स्पर्धांकरिता वितरित केली गेली हा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद भाऊ कासट, प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त श्री. प्रवीण आष्टीकर, पास्टर प्रकाश बंगाली, सहाय्यक सल्लागार समाज कल्याण दिव्यांग विभाग श्री. पुरुषोत्तम शिंदे मा. श्री प्रदीपजी जैन, मा. नगरसेविका सौ. सपना ताई ठाकूर, इत्यादी उपस्थित होते या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते स्नेहसंमेलनाची बक्षीस वितरण करण्यात आले. पाहुण्यांनी संस्थेबाबत संस्थेच्या कार्याबाबत गौरव उद्गार काढत ही संस्था दिव्यांग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारी संस्था असून अमरावतीचा मान या संस्थेमुळे व संस्थेच्या कार्यामुळे उंचाविलेला आहे या संस्थेचा आदर्श ठेवून इतर संस्थांनी ही असेच कार्य करावे असे विधान करण्यात आले.

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाच्या समारोपीय बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रशांत गाडगे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एन. एस. इंगोले व आभार प्रदर्शन व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. पंकज मुदगल यांनी केले यावेळी मंचकावर संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण मालपाणी सचिव श्री. प्रदीप श्रीवास्तव उपस्थित होते बक्षिसे मिळवून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता संपूर्ण स्नेहसंमेलन सुंदर व आनंददायी वातावरणात पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *