मनपा शाळांनी धरली गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची कास – विधिमंडळ समन्वयक संजय खोडके

मनपा हिंदी कन्या शाळेत सावित्री-ज्योती फुले उत्सव

अमरावती ०७ जानेवारी : राईट टू एज्युकेशन नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याला घेऊन शासनाचे प्रयत्न सुरु असतांना मनपा शाळांचा दर्जा देखील सुधारणे जरुरीचे आहे. दिल्ली येथिल सरकारी शाळेच्या धर्तीवर अमरावती मधील मनपाच्या शाळांमध्ये सुद्धा आता नाविन्यपूर्ण उपक्रम , भौतिक सुविधा व इंग्रजी माध्यमांचे अद्यावत शिक्षण मिळत असल्याने शिक्षाणपासून दूर जाणारा घटक आता शिक्षणाच्या प्रवाहात आला आहे. मनपा शाळांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची कास धरल्याने आगामी काळात समाजात निश्चितच आमूलाग्र बदल घडणार असल्याचे मनोगत विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी व्यक्त केले.

नागपुरी गेट परिसर स्थित सावित्री ज्योती फुले उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. मनपाच्या हिंदी कन्या व माध्यमिक विद्यालय ,मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक – १२ च्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी सावित्री ज्योती फुले उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटनीय भाषणात ते बोलत होते . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनपाचे शिक्षणाधिकारी-डॉ. अब्दुल राजीक तर प्रमुख अतिथी म्हणून नागपुरी गेट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम,जयश्री देशमुख, नंदकिशोर करपेकर, प्रेमचंद बिजोरे,सहायक कार्यक्रम अधिकारी-पंकजकुमार सपकाळ,सनाउल्लाह सर,मुख्याध्यापक-डॉ. प्रकाश मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अतिथींच्या हस्ते पूजन – माल्यार्पण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक – संजय खोडके यांच्यासह सर्व अतिथींचा शाल- वृक्षारोपटे देऊन मनपाच्या मुख्याध्यापक- डॉ. प्रकाश मेश्राम,वंदना फुंदे व शिक्षकवृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना संजय खोडके म्हणाले की, मनपा शाळेत इंग्रजी माध्यमांचे शिक्षण, भौतिक सुविधा तसेच क्रीडा सुविधा बरोबरच शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण व प्रशिक्षणाची सोय झाली आहे. त्यामुळे याचा प्रतिसाद पाहण्यासाठी मनपाच्या सर्व शाळांच्या पालकांना आमंत्रित करून सामूहिक पालकसभेचे आयोजन केल्यास त्यांच्या समस्या जाणून घेऊन विद्यार्थ्यांच्या अपेक्षेनुरूप आवश्यक ते बदल करणे सोयीचे होईल . .आगामी काळात हिंदीचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण स्थानिक विद्यार्थ्यांना लाभावे, याकरिता सुद्धा प्राधान्याने आपण प्रयत्नरत आहोत. शासनस्तरावर प्रयत्न करत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षित व प्रगत होण्यासाठी सर्व शक्यप्राय प्रयत्नातून नाविन्यपूर्ण धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. असे देखील विधिमंडळ समन्वयक संजय खोडके म्हणाले. तर मनपाचे शिक्षण अधिकारी-डॉ. अब्दुल राजीक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गेल्या २० वर्षांपासून स्थानिक नागरिक यांची कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुविधा उपलब्धीची मागणी खोडके दाम्पत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाली आहे. पहिल्यांदाच क्रीडा शिक्षक नियुक्ती, इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, मनपाच्या शाळेत भौतिक सुविधांची पूर्तता,जमील कॉलोनी स्थित शाळेत कनिष्ठ महाविद्यालय करिता प्राप्त झालेली मान्यता याचे सर्वस्वी श्रेय आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनांच आहे. अल्पसंख्याक भागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी व स्थानिक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी ही बाब उपयुक्त व अविस्मरणीय ठरणारी असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान शुभ दिन आयो रे. .,स्कूल चले हम….., बम बम बोले…… आदी गीतांवर मनमोहक नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधल्याचे चित्र दिसून आले.

कार्यक्रमप्रसंगी-हबिबखा ठेकेदार, सादिक रजा, अबरार मोहम्मद साबीर, हाजी मोहम्मद रफिक,फारुखभाई मंडपवाले, सामी पठाण,सयद साबीर, नईमभाई चुडीवाले, बबलू अंपायर,मोईन खान, सहायक कार्यक्रम अधिकारी-पंकजकुमार सपकाळ,गणेश सावंत,शालेय शिक्षक-मंगला व्यास,भावना बढे, अनिता भांगे,राजश्री कुलकर्णी, निकहत परवीन,मोनाली थोटांगे, पौर्णिमा गजभिये, अर्चना किन्हीकर, संतोष साहू,शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीं – पालक व आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *