आज राज्यातील 10 हजार समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं ‘कामबंद आंदोलन’

महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. जय सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंबंधी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर हे आरोग्य अधिकारी आज निदर्शनं करणार आहेत.

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करून ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावं यासह अशा अनेक मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *