पोलीस स्टेशन खोलापुरी गेट डी.बी पथकाकडुन अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीस अटक 3 घरफोड्या व 1 चोरीचा गुन्हा उघड

पोस्टे खोलापुरी गेट हद्दीत वाढत्या घरफोड्या , चोरी संबंधाने गुन्ह्यांचा संमांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आण बाबत मा . पोलीस आयुक्त श्री . नवीनचंद्र रेड्डी सा . यांनी पोलीस निरिक्षक पोस्टे खोलापुरी गेट यांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पो.नि. पोस्टे खोलापुरी गेट अमरावती शहर यांनी घरफोडी , चोरी सारखे गुन्हे उघडकीस आ बाबत पोस्टे गुन्हे प्रकटीकरण ( डी.बी. ) पथक यांना सुचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने दिनांक 16/01/2023 रोजी पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना एक ईसम गडगडेश्वर मंदीराचे मागील परीसरात विरळ लोकवस्तीत संशयीत रित्या फिरतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेउन विचारपुस केली असता उडवा उडवीचे उतरे देउ लागला त्याचे अंगझडीत पोस्टे अप.क्र . 311/2022 कलम 454,380 भादवि चे गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला . सदर आरोपी नामे साहील कैलास राऊत वय 21 वर्ष रा . गांधी आश्रम अमरावती यास ताब्यात घेउन पुन्हा विचारपुस केली असता त्याने पोस्टे खोलापुरी गेट अभिलेखावरील दाखल असलेले 3 घरफोड्या व 1 चोरीची कबुली दिल्याने त्याचे कडुन चारही गुन्हयातील एकुन 76000 / – रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदरची कार्यवाही मा . नविनचंद्र रेड्डी सा . पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री . विक्रम साळी सा . पोलीस उपायुक्त · परीमंडळ – 2 श्रीमती पुनम पाटील स.पो.आ. राजापेठ विभाग यांचे मार्गदर्शनात पोस्टे खोलापुरी गेट चे वरीष्ठ 1 पोलीस निरिक्षक श्री . गजानन तामटे , पो.उप.नि. प्रदीप होळगे , पो . हेकॉ . अशोक पिंपळकर , ना.पो.कॉ. सुधीर प्रांजळे , ना.पो.कॉ. मंगेश भेलाये ना.पो.कॉ. नाजिमोद्दीन सय्यद पो.कॉ. मंगेश हिवराळे , पो.काँ . सागर कबाडे , चालक भुनंदन पवार पोस्टे खोलापुरी गेट अमरावती शहर यांनी केली . ● ●

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *