अमरावती | ललिता वानखडे यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 जाहीर

श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था निमित्ताने श्रावस्ती स्नेहसोहळा 2023 गौरव महाराष्ट्राचा सन्मान मराठी माणसाचा हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या मध्ये सामाजिक, शैक्षणिक,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळामध्ये अमरावतीच्या साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ललिता राजू वानखडे यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 जाहीर झाले आहे.आणि त्याच बरोबर त्यांना आणखी त्यांचा बहुजन टायगर सामाजिक संघटना खामगाव महाराष्ट्र येथे दिनांक २८ जानेवारी ला दुपारी १२ वाजता शाॅल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.यांनी आपल्या दु:खावर मात करून,आपले कुटुंब सांभाळून या साहित्याचे लिखाण केले.

हा कार्यक्रम दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ वेळ दुपारी ३ ०० वाजता स्थळ ना. बा. घोरपडे नाट्यगृह,इचलकरंजी, जि. कोल्हापूर ला ललिता वानखडे यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *