२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी भव्य रक्तदान शिबिर, आमदार सुलभाताई खोडकेंनी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन केला सत्कार

धन्वंतरी नगर मित्र मंडळ, फरशी स्टॉप मित्र मंडळ आणि दस्तुर नगर चौक मित्र मंडळ च्या वतीने आयोजन

आयुर्वेदिक कॉलेज समीप हॉटेल कशीष पंजाबी तडका येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिराचे स्थळी आमदार-सौ. सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके यांनी भेट दिली.गेल्या१५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरादरम्यान आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आयोजकांचे अभिनंदन करीत सर्व उपस्थितांना यावेळी गणतंत्रदिन च्या शुभेच्छा दिल्या. जस्सी नंदा,गुरुप्रीत नंदा व मित्र परिवार तसेच अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे वतीने यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके, संजय खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. १२२ युनिट रक्त संकलन झाल्याबद्दल आयोजन समितीच्या सर्व सदस्य व पीडिएमसी ब्लड बँक चे कर्मचारी यांचे सुद्धा यावेळी खोडके दाम्पत्याने अभिनंदन केले. स्व. राजेंद्र हंबर्डे, इंद्रजित कौर नंदा, सौ गुरुमित कौर नंदा यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिराचे स्थळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करीत यावेळी जस्सी नंदा यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी यश खोडके, महेंद्र भुतडा, डॉ. संजय कुलकर्णी, श्याम शर्मा, रितेश व्यास, राजेंद्र महल्ले, अमर्जीत सिंग जुनेजा, हितेश केडीया, उमेश पाटणकर आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *