संत गजानन महाराजांच्या १४५ व्या प्रगटदिनानिमित्त आयोजित सोहळ्याला आमदार सुलभाताई खोडके यांची भेट

  • ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन केली विश्वकल्याणाची प्रार्थना
  • दिंडी, शोभायात्रा, रुद्राभिषेक, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, भागवत सप्ताह, महाप्रसादाचे भव्य आयोजन स्थळी भक्तांची मांदियाळी

अमरावती १३ फेब्रुवारी : सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सव सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.संत गजानन महाराज यांचे जीवन चित्रच अलौकिक आहे,साक्षात्कारी आहे. भक्तांच्या कल्याणासाठी गजानन महाराज यांनी अनेक चमत्कार घडविले. सर्वांच्या कल्याणाची भावना त्यांच्या हृदयात ठाण मांडून होती. सर्वांसाठी दयाशांती त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरून वाहत होती. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करून देणारी ती कामधेनू व कल्पित वस्तू प्राप्त करून देणारा ते कल्पवृक्ष होते. श्री गजानन महाराज यांचा चरित्र रुपी महिमा, संतकवी दासगणू महाराज यांनी श्री गजानन विजय या ग्रंथात मधुर व रसाळ वाणीत लिहलेला आहे. संत गजानन महाराज एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवतरले. तिथी होती माघ वद्य सप्तमी, यंदा तारखेनुसार १३ फेब्रुवारीला आहे. देशाच्याच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सद्गुरू भक्तांचे वतीने प्रगट दिनोत्सव सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच शृंखलेत अमरावती शहरात आयोजित श्री गजानन महाराज भक्त परिवाराचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थित राहून ब्रह्मांडनायक संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन यावेळी कृपाशीर्वाद घेतले.

यावेळी संत गजानन माऊली यांचे प्रतिमेस वंदन-पूजन-माल्यार्पण करीत सुलभाताई खोडके यांनी यावेळी आराधना-उपासना करण्यासह भावीकभक्त यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी व विश्वकल्याणाची प्रार्थना केली. गाडगे नगर – राठी नगर येथे संकटमोचन हनुमान ट्रस्ट द्वारे आयोजित प्रगटदिन सोहळ्याचे स्थळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या निधीतून देवालय परिसराच्या खुल्या जागेवर डोमशेड उभारण्यात आल्याने ही बाब भक्तपरिवार यांच्याकरिता सुखावह झाल्याने यावेळी महिला भगिनी यांचे वतीने सुद्धा सुलभाताई खोडके यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तद्नंतर विलास नगर येथे जाऊन श्रींचे दर्शन घेऊन सुलभाताई खोडके यांनी तेथील अध्यात्मिक आयोजन कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.

गण गणात बोते चा सर्वत्र गजर तसेच भक्तिमय गीतांचे भक्त परिवाराचे वतीने सादरीकरण यासोबतच सद्गुरू भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांचे वतीने करण्यात आलेली पेयजल सुविधा उपलब्धता आदी बाबी लक्षात घेता, या शिस्तबद्ध आयोजन अंतर्गत भर उन्हात भक्तांची गैरसोय होऊ नये,यासाठी स्वयंसेवी परिवार सदस्यांची तत्परता यामुळे या भव्यदिव्य आयोजनाची प्रचिती सर्वानाच आल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. यासोबतच कठोरा रोड स्थित सुसंयोग कॉलनी येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन संत शिरोमणी गजानन माऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन सुलभाताई खोडके यांनी यावेळी मनोभावे उपासनेतून श्रींचे दर्शन घेतले. तसेच रहाटगाव, अर्जुन नगर, क्रांती कॉलोनी-सातूरना, रहाटगाव येथील मंदिरात भेट देऊन प्रगट दिन सोहळ्यात सहभागी होऊन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अध्यात्मिक आनंदाची अनुभूती अनुभवित ईश्वरी सेवा-सानिध्य-कृपादृष्टी सर्वांनाच लाभावी. याकरिता यावेळी ब्रह्मांडनायक संत गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना केली.

यावेळी यश खोडके, प्रशांत डवरे,प्रमोद महल्ले, ऋतुराज राऊत , योगेश सवई,प्रशांत धर्माळे,गजू लोखंडे, प्रवीण भोरे,प्रा.डॉ.राजेश उमाळे,गुड्डू धर्माळे,के. टी. गावंडे,मनीष करवा , सारिका महल्ले , मीनल सवई , रुपाली धर्माळे , रीना भोरे , लीना डवरे , स्नेहल राऊत आदीसह भावीकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *