लाल परीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती; वर्ध्यात सहा बस गाड्यावर महिला चालक

एस टी महामंडळाच्या लाल परीला चालविण्यासाठी राज्यात महिला चालकांची भरती झाली आहे. राज्यात 438 महिला चालक म्हणून कार्यरत होत आहेय. तर वर्ध्यात 6 महिला चालक काही दिवसात औपचारिकरित्या रुजू होत आहे. नियुक्त झालेल्या या महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच हे प्रशिक्षण संपून त्या प्रत्यक्ष चालक म्हणून लाल परीचे स्टेअरिंग सांभाळणार आहे. महामंडळाच्या लाल परीचे स्टेअरिंग महिला चालकाच्या हाती येणार असल्याने प्रवस्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे आव्हान या महिला पेलणार आहे.

वर्धा जिल्ह्यात एस टी आगारात सहा महिला चालक म्हणून नियुक्त झाल्या आहे. राज्यातील विविध भागातून दाखल झालेल्या या महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. आजवर एसटीत आरक्षणाच्या सीट वर बसणाऱ्या महिला चक्क बस चालकाच्या सीटवर बसणार असल्याने महिला चालक म्हणून त्या अभिमान व्यक्त करताहेत. अंशी दिवसाचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण होऊन महिलांच्या हाती स्टेअरिंग येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावखेड्यात पोहचणारी लालपरी महिला चालकांच्या माध्यमातून रस्त्यावरील खाचखडगे पार करीत गावात पोहचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *