वाशिम जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा गहू हरभऱ्यासह फळ बागांच्या पिकाचे ही नुकसान

वाशीम काल सायंकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, आज १७ मार्च रोजी सायंकाळी वाशीम तालुक्यातील वाई वारला तर मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी शेतशिवारात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. तर काही भागात कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी शेत शिवारात जोरदार गारपीट झाली. या वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच इतर पिकांचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गत दोन दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम सुरू असून आज जिल्ह्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने विविध भागातील विविध पुरवठाही खंडित झाला होता. वाशिम जिल्ह्यातील वनोजा वाई पांगराबंदी अमनवाडी पिंपळशेंडा सह अनेक ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने
शेकडो हेक्टर वरील पिकांना मोठा फटका बसला आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाऊस झाला आहे अचानक झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील गहू, कांदा, टोमॅटो, लिंबू, संत्रा आंबे तसेच फळबागाचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *