चंद्रपूर : गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक तस्करी; एम.आर. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा, ३२०० किलो प्लास्टिक जप्त

चंद्रपूर : प्लास्टिक बंदी असताना गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तस्करी सुरू आहे. महापालिका पथकाने शहरातील एका वाहतूक कंपनीच्या गोदामावर छापा टाकून प्लास्टिक जप्त केले आहे.

महापालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे रहमत नगर येथील एम.आर. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा टाकून ३२०० किलो प्लास्टिक पिशवी व खर्रा पन्नी जप्त करण्यात आल्या. प्लास्टिकचा साठा करणाऱ्या गोडाऊन धारकाकडून ५००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. श्री ओम प्लास्टिक यांच्या नावाने नोंद असलेल्या प्लास्टिक पिशव्या या गुजरातमधील हलोल शहरातून, तर लक्ष्मी चंद्रपूर या नावाने नोंद असलेल्या खर्रा पन्नी या रायपूर शहरातून चंद्रपुरात आल्याचे निदर्शनास आले आहे.

ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके, भुपेश गोठे, मनीष शुक्ला, राज हजारे, अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *