यवतमाळात उद्या जीवन विद्या परिचय सत्र – सोम त्यागींचे मार्गदर्शन

प्रतिनिधी श्रीकांत खोब्रागङे

यवतमाळ – जीवनविद्या परिवाराच्या वतीने सोमवार, ३ एप्रिल रोजी यवतमाळ येथे जीवन विद्या परिचय सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक जाजू इंग्लिश मीडियम स्कूल, नारिंगे नगर, धामणगाव रोड यवतमाळ येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘जिंदगी को समझनेमें कहीं देर ना हो जायें…’ या विषयावर परिचयसत्रात जीवनविद्येचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक व मार्गदर्शक सोम त्यागी (रायपूर) हे मार्गदर्शन करणार आहेत.
या परिचय सत्रात जीवनविद्येच्या मध्यस्थ दर्शनाद्वारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखी कसा होईल, याचे तात्विक, तार्कीक आणि व्यवहारिक मार्गदर्शन होणार आहे. जीवन संवादी, आनंदी व सुखी बनविण्यासाठी उपयुक्त असलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *