स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे सोमवारी आयोजन

प्रतिनिधी – श्रीकांत खोब्रागङे

भारतीय जनता पार्टी, शिवसेना व विचार परिवारातील सर्व संघटना याच्या वतीने सोमवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यानेचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील दत्त चौक येथुन या यात्रेची सुरूवात होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर विसाव्या शतकातील क्रांतीकारकांचे मुकुटमणी, राष्ट्रसंतांचे एक विरमणी, समाजक्रांतीकारकांचे प्रमुख अग्रणी, बुद्धीवादी, विज्ञानवादी, सत्यवादी, दुरद्रष्ठा, स्वदेश: स्वदेव व स्वधर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे कर्तव्यनिष्ठ असे होते. “देशाचे स्वातंत्र मिळविण्यासाठी सशस्त्र क्रातीचा सेतु उभारुन मारिता मारिता मरेतो झुंजेन असा संकल्प करुन तो पुर्णत्वास नेणारे असे सावरकर होते. अनादि मी अनंत मी, अवश्य मी भला असा आध्यात्मिक दृष्टीकोन जोपासणारे सावरकर होते. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे हे कमाल काव्य लिहिणारे कवीमनाचे सावरकर होते. पोथीनिष्ठा दूर ठेवत विज्ञाननिष्ठा जोपासत हिंदुत्व, हिंदु पदपातशाही ही ग्रंथ संपदा लिहिणारे सावरकर होते. सागर विक्रमी देशभक्त सावरक होते.

अशा बुद्धीवादी, तत्ववादी, विचारवंताचे जीवनदर्शन घडावे हाच एकमेव या गौरव यानेचा उद्देश आहे. तरी समस्त सुजाण बंधुभगिनिनी या गौरव यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मदन येरावार तथा विचारपरिवारातील सर्व संघटना यांनी केले आहे.

चौकट

असा राहील गौरव यात्रेचा मार्ग

दत्त चौक येथुन सुरू होणारी ही सावरकर गौरव यात्रा पुढे मार्गस्थ होवून नेताजी चौक, पाचकंदिल चौक, अप्सर चौक, लोखंडी पूल, गांधी चौक, तहसिल चौक, जाजू चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत संतसेना चौक येथे समारोपीय सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *