उत्पादन मुल्य प्रत्येक वस्तु वर अंकित करावे – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक ची मागणी

प्रतिनिधी – श्रीकांत खोब्रागङे

यवतमाळ: एम आर पी ही फसवी आहे. ही बाब एका वस्तु वर तिच वस्तु फुकट देण्याच्या फंड्यावरुन समजते. त्यामुळे उत्पादन मुल्य प्रत्येक वस्तु वर अंकित करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी केली. ते रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी यवतमाळ येथील सुखकर्ता होटल मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते विशेष दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्हा बैठक सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली होती. विद्यमान एम आर पी प्रणाली ही रद्द करण्याची मागणी मागील काही वर्षापासुन केली जात आहे. पण सरकार त्यास मंजूर करत नाही.त्यामुळे ग्राहकांचे शोषण होत आहे. एक वर एक फ्री देऊन ही व्यापारी नफा कमावत आहे. त्यामुळे त्यांची मार्जिन किती जास्त आहे, हे स्पष्ट होते. तसेच यवतमाळ जिल्हा चे कार्य उत्कृष्ट आहे. बाकी राज्यांसोबत, जिल्हातील काय समस्या आहेत, तसेच त्यांची केंद्रिय कार्यकारणी कडुन काय अपेक्षा आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हा दौरा करत असल्याचे पाठक म्हणाले. यावेळी विदर्भ प्रांत अध्यक्ष डा नारायणराव मेहरे, प्रांत सचिव गुणवंत काकडे उपस्थित होते. त्यांनी यावेळी उपयुक्त माहिती दिली. या बैठकीस संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, तालुका अध्यक्ष,सचिव,संघटक आणि कार्यालय प्रमुख,कोषाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते. यवतमाळ बैठकी नंतर डा मेहरे यांचे सोबत ते अमरावती जिल्हा बैठकीस उपस्थित रहायला रवाना झाले. संचालन एड राजेश पोहरे तर आभार शेखर बंड यांनी मानले. यावेळी हितेश सेठ सह सर्व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *