यवतमाळ – रिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले… आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू

यवतमाळच्या वणी येथून शिंदोला येथे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मायलेकींचा मृत्यू झाला आहे. भरधाव असलेल्या ट्रकने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलीसह आईचा जागीच मृत्यू झाला. ही महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह गावी जात होती. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ट्रकच्या धडकेत संजीवनी नागतुरे आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मायलेकी या कुर्ली गावातील रहिवाशी होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात एकूण सहा जण जखमींझाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *