अंजनगाव सुर्जी उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू व्हावे कृती समितीचे अशोक मोरे यांची मागणी आक्रमक होऊन उपोषणाचा पवित्रा

अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रवेशद्वारा समोरचे जागेत उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु करण्यात यावे , या मागणीसाठी कृती समितीचे कार्याध्यक्ष अशोक मोरे व गणेश रोंघे यांच्यासह अनेकांनी उपोषणाचा पवित्रा घेतला . या रुग्णालयाच्या कामासाठी जे जुने मोडकळीस आलेली कर्मचारी निवास स्थाने पाडण्यास अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती यांची ना हरकत प्रमाणपत्र मिळताच हे काम आरंभ होईल असे पत्र दिले आहे. परंतु फक्त इमारत बांधकाम सुरू करणे बरोबरच ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत ही पदे त्वरित भरावे, नवजात बालकांचा सुरक्षा कक्ष रक्तपेढी प्रयोगशाळा तज्ञ सोनोग्राफी इत्यादी सुविधा पुर्ततेच्या मागणी सुद्धा उपोषण कर्त्यांनी केली आहे. उपोषण मंडपात महेश खारोळे माजीपंचायत समिती सभापती,संचालिका खरेदी विक्रीअर्चनाताई पखान, समता सैनिक दल सिध्दार्थ सावळे , बंडूभाऊ मेसरे शुभम बाळापूरे AISF अमरावती यांनी भेट देऊन आपले समर्थन दिले.
या संदर्भात लोक प्रतिनिधी व आरोग्य प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळताच अखेर उपोषण सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *