पोलीस आयुक्त यांचे विशेष पथकाची आय . पी . एल . या क्रिकेट सट्यावरील कार्यवाही

श्री नविनचंद्र रेड्डी , पोलीस आयुक्त अमरावती शहर यांचे आदेशाने विशेष पथकातील पो.उप नि . गजानन राजमल्लु तसेच पो.हे.का. सुनिल लासुरकर , ना.पो.शि. जहीर शेख , अतुल संभे , पो . शि . राहुल ढेंगेकर , विनोद काटकर , सागर ठाकरे यांना मिळालेल्या माहीतीवरुन दि . 11/04/2023 रोजी विशेष पथक पो.स्टे . बडनेरा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना अंदाजे 21/40 वा . दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्री लायक माहीती प्राप्त झाली की , साईनगर येथील यशवंत लॉन समोर एक इसम मुंबई इंडीयन्स विरुद्ध दिल्ली कॅपीटल या आय.पी.एल. क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनचे सहाय्याने लोकांना लिंक देवुन बेटींग घेवुन सट्टा जुगार खेळ पैश्याची बाजी लावुन हारजितचा खेळ खेळवित आहे . वरुन प्राप्त माहीतीवरुन जावुन रेड केली असता नमुद आरोपी हा मुंबई इंडीयन्स विरुद्ध दिल्ली कॅपीटल या आय . पी . एल . क्रिकेट सामन्यावर मोबाईल मधील गुगल क्रोम मध्ये Bholexch या नावाचे गैरकायदेशीर सॉफ्टवेअर बनवुन लोकांना खरे आहे असे भासवुन त्या मध्ये चालु असलेल्या क्रिकेट मँचचे भावावर फोनचे सहाय्याने बेटींग करतांना मिळुन आला . त्याला सदर अँप बाबत विचारणा केली असता त्याने सदरचे अँप योगेश साबु रा . छांगाणी नगर अमरावती . याच्या कडुन घेतले असुन तो त्याना बेटींग सट्टा खेळवित असुन त्या दोघांची सदर व्यवहारामध्ये भागीदारी असल्याचे सांगीतले . यातील आरोपी नामे योगेश साबु याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही . वरुन ताब्यातील आरोपी नामे हर्षद दिलीपकुमार जयस्वाल वय 29 वर्ष रा . जटाळपेठ , सातव चौक ह.मु. अकोली रोड ( गौरी अपार्टमेन्ट ) अम यांच्याकडून जप्ती पंचनाम्याप्रमाणे पाढ – या काळ्या रंगाचा आय फोन 13 कि.अ. 55,000 / – रु . चा माल जप्त करण्यात आला असुन नमुद दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 420,465 , 468 , 471,34 भा.द.वि. सह कलम 12 ( अ ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *