हिवरखेड – महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

(जितेंद्र ना.फुटाणे):- नवशक्ती चौक हिवरखेड येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो चे पुजन व हारार्पन हे सावित्री शक्ती पिठ शाखा हिवरखेड तसेच लोकनियुक्त सरपंच सौ.सविताताई गोपालभाऊ मालपे यांचे तर्फे करण्यात आले. तसेच ऱ्यालितील झ्याकी वरील महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुलेतील वेशभूषा धारक मुलांचे पुजन हे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. संजयभाऊ दंडाळे, श्री. पुंडलिकराव चौधरी यांनी मुलांचे हारार्पन व पुजन करुण हारार्पन केले आणि झ्याकीला सुरवात करण्यात आली. नवशक्ती चौक , ढेरा चौक, गांधी चौक, भवानी चौक येथे विजयराव (बाबासाहेब)धरमकर यांनी जंगी स्वागत केले,नंतर बौद्ध विहार, पोस्ट आॅफिस,गुजरी बाजार, सत्संग चौक मार्गे पुन्हा नवशक्ती चौक वासप अशा प्रकारे हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *