गुरुकुंजातील महामार्गालगत असलेल्या अतिक्रमनावर कारवाईचा बुलडोजर

गुरुकुंज मोझरी । गुरूकुंज मोझरी गुरुदेवनगर येथे राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणाने गेल्या काही महिन्यांपूर्वी एका भावी डॉक्टरचा बळी घेतला होता. तेव्हापासून येथील बेकायदेशीर अतिक्रमणाचे प्रकरण येथे चांगलेच तापले होते . विविध राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी त्यावेळी केली होती, व त्यांनतरही राष्ट्रीय महामार्गालगत अनेक अपघात झाले, त्याची दखल घेत आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने अवैध व बेकायदेशीर असणाऱ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करत . राष्ट्रीय महामार्गालगत असलेले बेकायदेशीर अतिक्रमण काढले आहे. भारतातील सहाव्या क्रमांकाच्या अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले, तेव्हा येथे राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोरून बंदिस्त उड्डाणपूल प्रस्तावित होता. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व आश्रमाचे महात्म्य लक्षात घेता, त्यावेळी स्थानिक नागरिक व गुरूदेवभक्तांनी बंदिस्त उड्डाणपुलाला तीव्र विरोध करून खुल्या उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्यामुळे उड्डाणपुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून याच महामार्गावरून सहा किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता मंजूर करण्यात आला. त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जेमतेम या बायपासच्या कामाला सुरूवात झाली असून, येत्या काही दिवसात हा मार्ग वाहतुकीसाठी पर्याय ठरणार आहे.दरम्यान, सध्या येथील महामार्गावर दोन्ही बाजूंनी झालेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण झाली होती . शंभर मीटर अंतरावर पादचारी मार्गच तयार करण्यात आला नसल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत होते, बसस्थानक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी, श्रीगुरूदेव महाविद्यालय हे एकाच मार्गावर असल्यामुळे येथे विद्यार्थी, भाविक व पादचाऱ्यांची सदैव रेलचेल दिसून येते. शिवाय येथील स्थानिक नागरिकांनीही महामार्गालगत असलेल्या अतिक्रमनाला तीव्र विरोध केला होता, त्याची दखल आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली असून. राष्ट्रीय महामार्ग जमीन व वाहतूक कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले, एकीकडे अतिक्रमनाच्या नावाखाली व्यावसायिक वर्गानी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी थाटलेली दुकाने हटविण्यात येत असली तरी देखील, ज्यांनी व्यापारीसंकुलणाच्या नावाखाली पक्के बांधकाम करून मोठमोठी दुकाने थाटली अश्या पंक्या व्यावसायिक दुकानांवर कुठलीच कारवाई न झाल्याने, ही कारवाई फक्त सर्वसामान्य गोर-गरिबांसाठी होती का, अशी चर्चा यानिमित्त दबक्या आवाजात येथील अनेक व्यावसायिक व नागरिकांनमध्ये सुरू होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, व पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात गुरुकुंजातील महामार्गालगत असलेले अतिक्रमण आज हटविण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *