रमजान’ बंधुभावाचा संदेष देणारा पवित्र महिना – मा.आ.सानंदा

राणा फाउंडेशन च्या वतीने आायेजित ‘रोजा इफ्तार’कार्यक्रमात मुस्लीम बांधवांनी घेतला सहभाग. सर्वांचा आदर करण्याची शिकवण देणारा पवित्र महिना म्हणजे रमजान होय.या महिन्यात पाळण्यात आलेल्या उपवासामुळे ईश्वर आराधनेमुळे संयम आणि त्यागामुळे अनेक व्यक्तीचे वाईट सवयी सुटतात.महिनाभर चांगल्या गोष्टीची सवय लागल्यामुळे तन-मन शुध्द होवुन व्यक्तीला नवजीवन प्राप्त होते..रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ठिक ठिकाणी सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव, सलोखा जोपासला जातो. खऱ्या अर्थाने रमजान हा बंधुभावाचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.मस्तान चौक मस्जिद समोरील प्रांगणात राणा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान महिन्यानिमित्त ‘रोजा इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मुस्लिम धर्मानुसार प्रत्येक सुदृढ, निरोगी व्यक्तीला रोजा ठेवणे अनिवार्य आहे, रोजा म्हणजे चौदा ते सोळा तास अन्न, पाणी त्याग करुन रोजा ठेवल्यास आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर महत्वाचे ठरते..परंतु फक्त उपाशी राहणे म्हणजे रोजा नव्हे, रोजा अर्थात उपवास ठेवतांना डोळे, कान, नाक, हात, पाय, मन, प्रत्येक अवयवाचा उपवास रोजा असतो आपल्या शरीरातील अवयवांना प्रत्येक अशा वाईट सवयी, वाईट कार्य, ज्या पासुन आपले व मानव जातीला त्रासदायक, घातक ठरेल. अश्या प्रत्येक वाईट सवयी, दृष्ट कार्यापासून दूर राहणे हे पण रोज्याचा चा एक भाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा ठेवलेल्या मुस्लिम बांधव- भगीनींच्या सर्व विधायक मनोकामना पूर्ण होवो असे सांगुन दिलीपकुमार सानंदा यांनी समाजात एकता प्रस्थापित होऊन हिंदू, मुस्लिम,शीख ईसाइ हम आपस मे है भाई- भाई असा संदेश अधिक वृध्दींगत होवो असे सांगुन त्यांनी उपस्थितांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *