विभक्त होण्याच्या मार्गावरील ८ जोडप्यांच्या पुन्हा रेशीमगाठी जुळल्या

श्रीकांत खोब्रागङे, प्रतिनिधी यवतमाळ.

विभक्त होणा-याच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या ०८ जोडप्यांनी रविवार दिनांक: ३०/०४/२०२३ रोजी कौटुंबिक न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत पुन्हा सुखाने नांदण्याचा निर्णय घेतला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ श्री एस. व्ही. हांडे, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री सुभाष रं. काफरे व श्री के. ए. नाहर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली.

यामध्ये कौटुंबिक स्वरुपाचे २२ दावे निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. या दाव्यांमधील ८ जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा संसार सुरु करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्याने त्यांचे परिवार व मुले आनंदी झाले आहेत. यावेळी न्यायाधीशांच्या हस्ते सोबत नांदायला गेलेल्या जोडप्यांना “नांदा सौख्यभरे थे प्रमाणपत्र व रोटरी क्लब ऑफ यवतमाळ तर्फे भेट वस्तु देउन सन्मानित करण्यात आले.

सद्या न्यायालयात वैवाहीक वादाचे व पोटगीसाठीचे ६७४ दावे प्रलंबित आहेत. यापैकी ५४ दावे लोक अदालतीसमोर निकाली काढण्यासाठी ठेवले होते. न्यायाधीश मा. श्री सुभाष रं. काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री डि. एस. थोरात, विवाह समुपदेशक श्रीमती ज्योती जी. माटे व अॅड. कु. शितल जयस्वाल यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले.

लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री संजय टी. जैन, अँड अमीत अ. बदनोरे, व कार्यकारणी सदस्य अँड शिल्पा घावडे, अॅड अनिल बजाज, अॅड सुरुची उपाध्याय, अॅड मोहन गिरटकर, अॅड देवयानी वाडे, अॅड भाग्यश्री खडसे, अॅड. नौशीन शाह व रोटरी क्लब ऑफ यवतमाळचे अध्यक्ष अजयजी म्हैसाळकर, सचिव दिलीप राखे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच प्रभारी प्रबंधक श्री नारायण जाधव, श्री प्रमोद फाळके लघुलेखक, श्री मो. शकील शेख वरिष्ठ लिपीक, श्री कार्तीक दळवी कनिष्ठ लिपीक, मनिष गंपावार कनिष्ठ लिपीक, सचिन पांगारकर कनिष्ठ लिपीक, श्रीमती सुनिता एस. सोनटके, श्री शुभम फरतोडे व श्री दत्ता जाधव या सर्व कर्मचा-यांनी लोकअदालतीच्या यशस्वीतेकरीता सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *