दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश

दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशाच्या वेळेस जोरदार घोषणाबाजी केली.
-सोलापूर जिल्ह्यातील आगमी लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद,ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील मळकोटा मधील विद्यमान भाजप ग्रामपंचायत सदस्यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केल्या मुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार सुभाष देशमुख आणि भाजपला हा मोठा फटका मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *