खान्देशची जीवनदायिनी तापी नदीला साडीचोळी अर्पण करून तापी जन्मोत्सव साजरा

सूर्यकन्या तापी नदीला आज जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात पूजन केले व साडीचोळी चा आहेर अर्पण केला. यावेळी संगमेश्वर या ठिकाणी तापी नदी पात्रात भाविकांनी गर्दी केली होती. तापी नदीला खान्देशची जीवनदायिनी असे म्हणतात. खानदेश समृद्ध करण्यासाठी तापी नदीचा मोठा वाटा आहे. तापी नदीने या भागात केवळ शेतीच जगविली नाही तर येथील समाज जीवन सुद्धा जगविले आहे. याचे ऋण फेडण्यासाठी महिला भाविकांनी तापी जन्म उत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पहाटेपासून भाविक संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्नान आणि पूजेसाठी आले होते. महिला, भाविकांनी तापी नदीत स्नान करत त्यानंतर तापी नदीचे पूजन केले व साडी-चोळी सह सोळा शृंगार अर्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *